उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
या वेळी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, पर्यवेक्षक साळुंखे, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुराश शेख, ए. आर. पाटील, एस. जी. म्हात्रे, एम. पी. पाटील, जांभळे मॅडम आदी विद्यालयातील सेवक वर्ग उपस्थित होता.