Friday , September 29 2023
Breaking News

चला झाडे खिळे मुक्त करू या!

खोपोली सहज सेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी : येथील सहज सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी खोपोली गावातील व आजूबाजूच्या परिसरात असणारी झाडे खिळे मुक्त करण्याचा संकल्प करून, शुभारंभ केला. शहरातील लक्ष्मीनगर रोडवर असलेल्या झाडाला सदस्यांनी प्रथम बॅनरपासून मुक्त केले. त्यानंतर त्या झाडावर असणार्‍या स्टेपलरच्या पिना व खिळे काढून टाकण्यात आले. पर्यावरणपूरक हा उपक्रम नगरपालिका व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भविष्यातही सुरू ठेवणार असल्याचे सहज सेवाचे शेखर जांभळे यांनी स्पष्ट करून, यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply