Breaking News

रोह्यातील मिनीडोअर चालकाने दाखविला प्रामाणिकपणा

रोहे ः प्रतिनिधी : येथील मिनीडोअर चालक विक्रांत विलास राणे यांना रस्त्यावर पिशवीत सापडलेले 29100 रुपये त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने मूळ मालकाला परत केल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहा तालुक्यातील इंदरदेव ठाकूरवाडी येथील गोविंद भाग्या शिद याला घरकुलचे 29100 रुपये मिळाले होते. ते पैसे बुधवारी (दि. 3) हरवले. त्याची माहिती दिल्यानंतर पोलीस राजेंद्र भोनकर यांनी सर्वत्र तपास केला, मात्र पैसे मिळाले नाहीत, दरम्यान शहरातील एकविरा मिनीडोअर स्टँडमध्ये मिनीडोअर चालक विक्रांत विलास राणे (रा. सानेगाव) हा नेहमीप्रमाणे गुरुवारी (दि. 4) स्टँडमध्ये आले होते. त्यांना त्या वेळी तेथे मळक्या पिशवीत

बँकेचे पासबुक व पैसे दिसले. राणे यांनी त्या पिशवीची माहिती  आपल्या सहकार्‍यांना आणि रोहा पोलीस ठाण्यात दिली. रोहा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक

शहाजी शिरोळे यांच्या हस्ते गोविंद शिद व त्यांच्या पत्नीला ही बँकेचे पासबुक व 29100 रुपये असलेली पिशवी परत देण्यात आली.

सहाय्यक निरीक्षक शहाजी शिरोळे यांनी मिनीडोअर चालक विक्रांत राणे याचे कौतुक व सत्कार केला. या वेळी पोलीस हवालदार गणेश राऊत, पोलीस नाईक राजेंद्र भोनकर, वैभव जाधव, रामशिन गायकवाड, मयुरी जाधव, वृषाली दळवी, एकविरा मिनीडोअर संघटनेचे संतोष पोकळे, प्रवीण गुंड, सचिन ठाकूर, कृष्णा घरत, अरविंद जाधव, ग्रामस्थ मंगेश कोकळे, अनंता कोकळे आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply