नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथे होणार्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींच्या रविवारी (दि. 24) झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे, जनार्दन वाघमारे आदी नावे चर्चेत होती. अखेर डॉ. नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नाशिक नगरीत 26 ते 28 मार्चदरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे.