Breaking News

पनवेल : वाजे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने शेकापचा दारुण पराभव करून अनेक वर्षांची मक्तेदारी मोडीत काढली. या ग्रामपंचायतीमधील विजयी शिलेदारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेश भोईर, राजेंद्र भालेकर, भगवान बुवा, राघो पाटील आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते सोबत होते. या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply