Breaking News

खारघरमधील कृत्रिम फुफ्फुस काळवंडले

राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने दखल घेण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी

खारघरच्या हिरानंदानी चौकात 15 जानेवारी रोजी वातावरण फाऊंडेशनने प्रदूषणाची गुणवत्ता तपासण्यासाठी पांढर्‍या शुभ्र रंगाचे कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आले होते. हे कृत्रिम फुफ्फुस अवघ्या 10 दिवसांतच काळवंडलेे आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

खारघर-तळोजा-पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदुषणाबाबत सामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वातावरण फाऊंडेशनने आखलेल्या एका आगळ्यावेगळ्या मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे खारघरच्या चौकात कृत्रिम फुफ्फुसे बसविण्यात आली होती. अशाच प्रकारची कृत्रिम फुफ्फुसांचे डिजिटल फलक यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये मुंबईच्या वांद्रे परिसरात उभारण्यात आली होती. ती फुफ्फुस देखील 14 दिवसांत काळी पडली होती तर दिल्लीत नोव्हेंबर 2018 मध्ये तयार केलेली कृत्रिम फुफ्फुसे अवघ्या सहा दिवसांत काळी झाली होती.

खारघर मध्ये बसविण्यात आलेल्या कृत्रिम फुफ्फुसांच्या स्थापनेच्या दुसर्‍याच दिवशी त्यांचा रंग काळा व्हायला सुरूवात झाली होती आणि सातच दिवसांत हा रंग करडा झाला. सोमवारी (दि. 25) मात्र या फुफ्फुसांचा रंग पूर्णतः काळा झाल्याचे दिसून आले. वातावरण फाऊंडेशनतर्फे 13 नोव्हेंबर 2020 ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यानुसार असे निदर्शनास आले की, खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास 17 तास प्रदुषित हवेत श्वास घेतात. या अभ्यासांती असे स्पष्ट झाले की, या भागातल्या हवेत सकाळी 6 ते 8 या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम 2.5 हा घटक सर्वाधित असतो.

हवेतील घातक घटक कारणीभुत

द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स असे शीर्षक देऊन ही कृत्रिम फुफ्फुसे खारघर येथील सेक्टर 7 मधील बँक ऑफ इंडिया चौकात उभारण्यात आली होती. वातावरण फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमात हवेचे अत्युच्च प्रदुषणामुळे घातक घटक आपल्या फुफ्फुसात जात असल्याचे दिसुन येत आहे. कृत्रिम फुफ्फुसाचे बदलेले रंग यामुळे हे दिसून येत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply