Breaking News

रायगडात 95 हजार जणांचे लसीकरण

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग हळुहळू वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 94 हजार 912जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 41हजार 603ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात 16जानेवारीला करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरूवातीला आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागातील फ्रन्टलाइन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. मात्र लसीबाबत साशंकता असल्याने सुरुवातीला लसीकरणाला खूप कमी प्रतिसाद मिळत होता. आरोग्य आणि फ्रन्टलाइन वर्कर्स लसीकरणासाठी फारसे इच्छुक नव्हते. नंतर मात्र लसीच्या सुरक्षीततेबाबत विश्वासार्हता वाढली. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी समोर आले. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला. जिल्ह्यात आत्तापर्यंत 94 हजार 912 जणांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यात 47 हजार 078 पुरुष तर 36 हजार 576 महिलांचा समावेश आहे. 83 हजार 659 जणांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. तर 11 हजार 253 जणांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण केले जात आहे. आत्तापर्यंत 41 हजार 603 ज्येष्ठ नागरिकांनी करोनाची लस घेतली आहे. तर 45 ते 60 वयोगटातील दुर्धर आजार असलेल्या 22 हजार 514 जणांनी लस घेतली आहे. 25 ते 40 वयोगटातील 16 हजार 109 जणांचे तर 18 ते 25 वयोगटातील तीन हजार 418 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल 56 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यात 41 शासकीय तर, 15 खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 81 हजार 462 जणांना कोव्हिशिल्ड तर 13 हजार 450 जणांना कोव्हॅक्सिनची लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 90 हजारहून अधिक व्यक्तींनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यातील एकाही व्यक्तीला गंभीर स्वरुपाचा त्रास झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे लस सुरक्षीत आणि प्रभावी आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे.

-डॉ. सुहास माने,  जिल्हा शल्यचिकीत्सक, रायगड, अलिबाग.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply