Breaking News

‘आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून आदिवासी समाजाने उत्कर्ष साधावा’

उसरोली येथे जातीच्या दाखल्यासाठी शिबिर

मुरुड : प्रतिनिधी

आदिवासी समाज मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. मात्र आपल्या मुलांना मोलमजुरीसाठी न नेता त्यांना चांगले शिक्षण दिल्यास आदिवासी समाजाचा निश्चित विकास होईल, असा विश्वास  मुरुडचे तहसीलदार गमन गावीत यांनी उसरोली येथे केले.

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  तहसील कार्यालय व उसरोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाला जातीचा दाखला तातडीने मिळावा यासाठी योग्य कागदपत्रे जमा करण्याकरिता उसरोली ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांना तहसीलदार गावीत मार्गदर्शन करीत होते. आदिवासी बांधवांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी मेळावा घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

उसरोली सरपंच मनीष नांदगावकर यांनी आपल्या भाषणात शिबिराचा हेतु विषद केला. या शिबिरात सुमारे दोनशे आदिवासी बांधवांनी जातीचा दाखला मिळण्यासाठी आपली कागदपत्रे सादर केली.

उसरोली उपसरपंच महेशकुमार पाटील, नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे, जगनाथ वाडकर, पुरवठा निरीक्षक सचिन राजे, कनिष्ठ लिपिक ए. डी. पाटील, नांदगाव तलाठी अरविंद देशमुख, उसरोली तलाठी संगीता भाटकर, आश्रम शाळा शिक्षक एस. बी. चव्हाण,  महेश अमृते, दिनेश जाधव  यांच्यासह आदिवासी बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply