नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 9 पैकी 5 कसोटीत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांतील अखेरच्या लढतीत भारताने 75 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने 303, तर केएल राहुलने 199 धावा केल्या होत्या. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी चांगली झाल्याने पहिल्या दोन्ही कसोटीत भारताचे पारडे जड मानले जात आहे.
इंग्लंडच्या भारत दौर्याची सुरुवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. याशिवाय पाच टी-20 लढती आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटीची सुरुवात चेन्नईतून होईल. पहिल्या दोन कसोटी चेन्नईत होणार आहेत. त्यानंतरच्या दोन कसोटी अहमदाबाद येथे होतील.
चेन्नईत आतापर्यंत झालेल्या 32 पैकी 14 कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. सहा सामन्यांत पराभव झाला, तर 11 सामने ड्रॉ झाले आहेत. चेन्नईत भारताने 7 बाद 759 ही सर्वोच्च धावसंख्या 2016 साली इंग्लंडविरुद्ध केली होती, तर याच मैदानावर 83 ही सर्वांत नीचांकी धावसंख्या आहे. 1977 साली इंग्लंडने भारताला 83वर ऑल आऊट केले होते. या मैदानावर सुनील गावसकर यांनी 12 कसोटीत 1018 धावा केल्या आहेत. त्यांनी चेन्नईत तीन शतके झळकावली आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …