Breaking News

पनवेल तालुका पोलिसांनी केले मनोरूग्ण व्यक्तीस कुटूंबीयांकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर

मनोरूग्ण इसमाला अथक प्रयत्न करून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केल्याने या व्यक्तीच्या नातेवाइकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक व आभार मानले आहेत.

रिटघर येथील पोलीस पाटील दीपक पाटील यांनी मोबाइल फोनद्वारे कळविले की, एक अनोळखी व्यक्ती रिटघर गावात जाणार्‍या रस्त्यावर फिरत आहे व तो बहुधा मनोरुग्ण असल्याने त्याला काही एक सांगता येत नाही. या प्राप्त माहितीवरून पोलीस पाटील व नेरे बीटचे अंमलदार ओंबासे यांनी या व्यक्तीस ताब्यात घेतले व तालुका पोलीस ठाण्यात आणले. नंतर त्याचे नातेवाइक व पत्त्याबाबत चौकशी करता काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती, अशा परिस्थितीत त्यास सील आश्रम येथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व शेवटचा पर्याय म्हणून त्यास लिहिण्यासाठी पेन आणि कागद देताच त्यावर त्याने मोबाइल नंबर लिहिला. मोबाइल नंबरवर वर संपर्क साधताच समोरील महिलेस मिळून आलेल्या व्यक्तीचे वर्णन व व्हॉट्सअ‍ॅप वरून फोटो पाठविला.

या वेळी महिलेने हा व्यक्ती त्यांचा मनोरुग्ण भाऊ असून त्याचे नाव राजू रविंद्र खातू (वय 45, रा. घर नंबर 6, लुईसवाडी, साईनाथ नगर) असल्याचे सांगितले व तो ठाणे येथून गुरुवारी (दि. 28) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता कोठेतरी निघून गेला होता, असे सांगितले. तसेच त्यांचा भाचा नामे विनोद विकास म्हात्रे (वय 33, रा. तोंडरे गाव, तळोजा) यांना पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे पाठविले व मनोरुग्ण व्यक्ती हा त्यांचा मामा असल्याची खात्री होताच त्यास सुखरूपपणे त्यांचे ताब्यात देण्यात आले.

मनोरुग्ण व्यक्तीची कौशल्यपूर्वक चौकशी करून त्यांच्या  नातेवाइकांचे ताब्यात देण्यात सहाय्यक निरीक्षक राम गोपाळ, हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, अंमलदार सतीश दराडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply