Breaking News

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका!

देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई ः प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे याबाबत काही शंकाच नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असे म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार! रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत ते रविवारी (दि. 13) बोलत होते. येत्या काळात 346 ओबीसी घटकांचा मेळावा घेणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही याबद्दलचे कलम टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे. ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.
ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करीत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करीत आहेत, मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात, असा टोला लगावून ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असा मंत्रिमंडळात ठराव आणा, असे असे फडणवीस म्हणाले. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेते उपस्थित होते.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply