Breaking News

कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली येथे भाजप बुथ संपर्क अभियान

खोपोली : प्रतिनिधी
आगामी काळात भाजपला भरभराटीचा काळ असल्याने बूथ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे केले. भाजप बुथ संपर्क अभियानासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा जिल्हाभर झंझावती दौरा सुरू आहे. या दौर्‍यात गुरुवारी (दि. 4) खोपोली येथे त्यांनी मार्गदर्शन केले, तर बुथवरचा कार्यकर्ता सक्षम कसा होईल यासाठी जिल्हा सरचिटणीस व संघटक अविनाश कोळी, दीपक बेहरे यांनीही उपयुक्त माहिती दिली.
या बैठकीस भाजप शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, विठ्ठल मोरे, शहर चिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, पिंगळे, महिला अध्यक्ष शोभा काटे, सुनील नांदे, सूर्यकांत देशमुख, अनिल कर्णूक, युवा मोर्चाचे अजय इंगुळकर, विनायक माडपे, अनिता शाह यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply