Breaking News

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब

चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन

रेवदंडा : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना अद्यापी शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ज्याचे बँक खाते नंबर चुकले होते, ते दुरूस्त करून कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त ग्रामपंचायत कार्यालयात येवून नुकसानीच्या मदत निधीची विचारणा करतात. येत्या आठ ते दहा दिवसात उर्वरीत नुकसानग्रस्तांना मदत निधी मिळण्यासाठी तहसिलदारांनी पुढाकार घ्यावा व लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी.

निसर्ग चक्रीवादळात चौलमधील बागायतीचे व घराचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र एकाही नुकसानग्रस्ताला शासनाच्या मदतीचा लाभ झालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे शासनाच्या मदतीची विचारणा करतात.  निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना त्वरेने मदतीचा निधी देण्यात यावा, अशी मागणी चौल ग्रामपंचायतीच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply