पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत भाताण येथे होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत भाताण येथील इलेक्ट्रीक डीपीपासून कृष्णा गाताडे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, भाताण व भाताण पाडा येथे हायमास्ट लाइट लावणे अशी कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी अनुक्रमे 15 लाख आणि तीन लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांमुळे भाताणला रस्ता आणि विजेची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या भूमिपूजन समारंभास भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक बबन मुकादम, भाताणचे सरपंच सुभाष भोईर, दीपक झुमारे, वसंत काठावले, अनिल काठावले, गणेश झुमारे, तानाजी पाटील, केशव गायकर, दीपक दुर्गे, महेंद्र गोजे, दीपक ठाकूर, देविदास पाटील, जनार्दन घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.