Breaking News

नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वांत मोठे ‘कलिंग’; बर्ड फ्लूमुळे तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार

नंदुरबार : प्रतिनिधी

राज्यातील सर्वात मोठे कलिंग नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये होणार आहे. नवापूरमध्ये तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत. येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक लाखपेक्षा अधिक पक्षी मारले जाणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने 100 पथके तैनात केली आहेत. एक पथकात चार पशुवैद्यकीय कर्मचारी आणि दोन महसूल कर्मचार्‍यांचा समावेश आहे. याकरिता धुळे, जळगाव अशा अन्य जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी नवापुरात दाखल होत आहेत. कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक औषधांचा साठाही करण्यात आला आहे. जेसीबीद्वारे बाधित पोल्ट्रीमध्ये मोठे खड्डे केले जात आहेत. यामध्ये कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे काम एकाच वेळी केले जात आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply