Breaking News

मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा

राज्य सरकारचा करणार निषेध

मुंबई : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने मराठा समाज एकत्रित येणार आहे. या ठिकाणी 11 वाजता आक्रोश आंदोलन पुकारण्यात येणार आहे. गेल्या दीड महिण्यापासून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. तरीही सरकारकडून मराठा बांधवांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. म्हणून मराठा समाज राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक झाला आहे.

दरम्यान, सरकारकडून पोलीस आणि उर्जा विभागात भरतीचे नियोजन करण्यात आले. जाणीवपूर्वक मराठा समाजाला नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठी हे केले जात असल्याच्या तीव्र भावना मराठा तरुणांकडून व्यक्त केल्या जात आहेत. या भरती प्रक्रिया म्हणजे मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राज्य सरकारने करू नये असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारयांनी सांगितले.

मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न अडकला असताना राज्य सरकारकडून अद्यापही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

-वीरेंद्र पवार, समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply