Breaking News

ओबीसी आरक्षण वाचवा! अधिवेशनात भाजपचा नारा !!

मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारचा (दि. 4) दुसरा दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्याने भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर काही मोठ्या लोकांचा दबाव आहे, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मध्य प्रदेशाप्रमाणेच राज्य सरकारने कायद्यात बदल करावा. आम्ही पाठिंबा देऊ, असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षण वाचवा अशी टोपी घालून विरोधी पक्षनेते फडणवीस आणि भाजपचे आमदार अधिवेशनात पोहचले. ओबीसींना आरक्षण देण्याचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला ही राज्य सरकारला चपराक असल्याचे सांगून ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी या वेळी भाजपने लावून धरली.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही सगळ्यांची भूमिका असल्याने ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मध्य प्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply