Breaking News

सरपंच-उपसरपंच निवडणुकीतही भाजपची सरशी

पनवेल : राम प्रहर वृत्त
जानेवारीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचांची निवडणूक बुधवारी (दि. 10) झाली. यातही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-रिपाइं युतीने विरोधकांना धूळ चारत बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले.
मागील महिन्यात विविध ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने रिपाइंच्या साथीने घवघवीत यश संपादन करीत नंबर वन कामगिरी केली. विशेषत: अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपच्या शिलेदारांनी काबीज करीत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले.
पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता राजेश पाटील, उपसरपंचपदी अशोक पाटील निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीत भाजपचे 12 सदस्य असताना प्रत्यक्षात 13 मते पडली. त्यामुळे शेकापचे एक मत फुटून ते भाजपला मिळाले. परिणामी शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे. वाजे, खैरवाडी, केवाळे, उमरोली, आकुर्ली, सावळे, वारदोली ग्रामपंचायतींची सरपंच-उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली राजेंद्र भालेकर, उपसरपंचपदी रेवण आत्माराम पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री शशिकांत दिसले, उपसरपंचपदी बाळाराम कोंडू पाटील, आकुर्लीच्या सरपंचपदी भारती सचिन पाटील, उपसरपंचपदी सत्यवान लक्ष्मण धरणेकर, उमरोलीच्या सरपंचपदी कमला बळीराम मढवी, उपसरपंचपदी रोशन शांताराम पोपेटा, वारदोलीच्या सरपंचपदी संगीता बाळू भुतांबरा, उपसरपंचपदी सविता संतोष पाटील, केवाळेच्या सरपंचपदी रेणुका अशोक गायकर, उपसरपंचपदी कांचन परशुराम पालकर, वाकडीच्या सरपंचपदी कुंदा बाळू पवार, उपसरपंचपदी अरुण नरेश पाटील, खैरवाडीच्या सरपंचपदी रजनी गोमा ढुमणे, उपसरपंचपदी हनुमान खैर, सावळेच्या सरपंचपदी प्रशांत नरेश माळी, उपसरपंचपदी कांता वसंत कांबळे, देवळोलीच्या सरपंचपदी काजल मंगेश पाटील, पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भावना विशाल जोशी, तर उपसरपंचपदी सतीश पाटील विराजमान झाले आहेत.
या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रिपाइंचे कोकण अध्यक्ष व पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply