Breaking News

अलिबागेत सायक्लोथॉनचे आयोजन

अलिबाग ः प्रतिनिधी
माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत अलिबाग येथे शुक्रवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग व अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप नाईक, लायन्स क्लब ऑफ अलिबागचे सचिव महेश चव्हाण, अविनाश राऊळ यांच्यासह संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या सायल्कोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 14 वर्षांवरील वयोगटातील मुला-मुलींना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. 40, 30 आणि 20 किलोमीटर अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. क्रीडाभुवन अलिबाग येथून स्पर्धेला सुरुवात होईल, तर जोगळेकर नाका येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्पर्धेचा समारोप होईल.
40 किलोमीटर गटातील स्पर्धेचा मार्ग अलिबाग मांडवा, रेवस हाशिवरे, कार्लेखिंड असा असेल, तर 30 किलोमीटर गटातील स्पर्धेचा मार्ग अलिबाग मांडवा दस्तुरी नाका येथून परत अलिबाग असा असेल. 20 किलोमीटर स्पर्धेचा मार्ग अलिबाग चोंढी अलिबाग असा असेल. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांनी वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सूचना आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने प्रदीप नाईक यांनी स्पर्धेच्या तयारीची माहिती या वेळी दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply