Breaking News

शाळकरी मित्र-मैत्रिणींची 51 वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी

सन 1968 साली दहावी (मॅट्रिक) झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा सिद्ध समाधी योग आश्रम, खोपोली येथे मोठ्या उत्साहात झाला. बडोदा, पुणे, मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. नुकतेच खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनअ‍ॅड. श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहसंमेलनाला 38 मित्रमैत्रिणींनी आपला सहभाग नोंदविला. स्नेहसंमेलनात पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार आनंद देवधर यांनी आपल्या कलाकृती आणि सुप्रसिद्ध व्यक्तींबरोबर झालेल्या गाठीभेटी यासंबंधीच्या आठवणींचे एक पुस्तक तयार केले आहे. तसेच पत्रकार रमेश भोळे यांनी साईंचे सोबती हे पुस्तक लिहिले आहे. या दोघांचा सत्कार त्यांच्या मित्रांनी या वेळी केला.

खालापूर तालुक्यातील खोपोलीचे वर्गमित्र वालचंद ओसवाल, आशा दामले, सुरेन जाधव, शांतीलाल पूनमिया, लक्ष्मण पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. पुढील स्नेहसंमेलन विजय वनगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. 51 वर्षांनंतर एकत्र आलेल्या आणि सध्या ज्येष्ठ नागरिक असणार्‍या शाळकरी मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply