Breaking News

पालीत दुकानाला आग

वायरमेन रूपेश ठोंबरेंच्या तत्परतेने दुर्घटना टळली

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पाली शहरातील स्लायडिंगच्या दुकानाला शनिवारी (दि. 13) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली. या वेळी वायरमन रूपेश ठोंबरे यांनी समयसूचकता दाखवत  तत्काळ केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाली शहरात शनिवारी रात्रीच्या सुमारास दीपक कुमार प्रजापती यांच्या स्लायडिंगच्या दुकानाला अचानक आग लागली. या वेळी दीपक कुमार प्रजापती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. टीआरपी चायनीज तसेच इतर शेजारील दुकानांच्या सतर्कतेमुळे दीपक प्रजापती यांच्या दुकानाला आग लागल्याची बाब लक्षात आली. शेजारील दुकानदार मालकांनी पालीतील महावितरणचे कर्मचारी वायरमन रूपेश ठोंबरे यांना फोनद्वारे आगीची माहिती कळविली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वायरमेन रूपेश ठोंबरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. महावितरणचे पाली शहरातील वायरमेन रूपेश ठोंबरे सदैव आपल्या कर्तव्यात तत्पर असतात. त्यांच्या कार्यतत्परतेने मोठा अनर्थ टळला. दुकानातील देव्हार्‍यात देवाजवळ लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply