Friday , September 29 2023
Breaking News

डी-मार्ट समोरील पाईपलाईनमधून पाण्याची चोरी

पनवेल : वार्ताहर  : सध्या सर्वत्र दुष्काळ असताना व मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी पाण्यासाठी वणवण करीत असताना नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील असणार्‍या पाण्याची पाईपलाईन फोडून मोठ्या प्रमाणात बिनदिक्कतपणे बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणारे फेरीवाले, झोपडपट्टीधारक व इतर नागरिक चोरी करीत असून या चोरीकडे अधिकारी, त्याचप्रमाणे सिडकोचे पाणी खाते दुर्लक्ष करीत असल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यापासून नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील असणार्‍या पाण्याच्या पाईप लाईनला अज्ञात समाजकंटकाने भगदाड पाडून ते पाणी बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणारे फेरीवाले, झोपडपट्टी धारक, तसेच त्या परिसरात सुरू असलेले नव्याने बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा कामगार वर्ग बिनधास्तपणे दिवसरात्र या पाण्याची चोरी करीत आहेत. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

हे सर्व रस्त्यालगत घडत असूनसुद्धा सिडकोचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पाणी चोरी डोळ्यासमोर होत असताना देखील त्यावर कारवाई होत नसल्याने स्थानिक रहिवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply