सकल मराठा समाज, खांदा कॉलनी
पनवेल : वार्ताहर
सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने शिवजयंती उत्सव-2021 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत मंडळाने शिवजयंती साजरी केली. यंदाचे 4 थे वर्ष होते. या वेळी खांदा कॉलनीसह पनवेल परिसरातील शिवप्रेमीसह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. अशी माहिती सकल मराठा समाज खांदा कॉलनीचे समनव्यक संतोष जाधव यांनी दिली.
सत्याग्रह महाविद्यालय
खारघर : प्रतिनिधी
सत्याग्रह महाविद्यालयात शिवजयंती निमित्त व्याखान्यमालेचे आयोजन कोविडच्या नियमांचे पालन करून करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनसामान्यपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी विद्यालयामार्फत केले जाते. यंदाचे हे 20 वे वर्ष आहे. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुण पीढीने आत्मसाथ करून त्याचा वारसा चालविण्याची गरज असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळाचा उजाळा दिला. प्रा. संगीता जोगदंड, प्रा. वनिता सूर्यवंशी, डॉ. प्रज्ञा खोपकर यांच्यासह मोजकेच कर्मचारी व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनीदेखील महाराजांच्या जयंतीनिमित्ताने विचार मांडले.
जासई विद्यालय, उरण
उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, मेघनाथ म्हात्रे, यशवंत घरत, रघुनाथ पाटील, सुनिल घरत, ग्रामपंचायत सदस्या कविता म्हात्रे, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, पर्यवेक्षक साळुंखे सर, बी. एल. पाटील, एम. एस. ठाकूर, एन. पी. नाईक, जी. आर. म्हात्रे, एस. जी. म्हात्रे, एस. व्ही. पाटील, एस. एम. बाबर तसेच विद्यालयातील सर्व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सम्यक सामाजिक संस्था, रसायनी-रिस
मोहोपाडा : सम्यक सामाजिक संस्था रिस यांच्या वतीने रिस (रसायनी) येथील संस्थेच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर उपस्थितांनी माहिती दिली.
या वेळी अजित कडलक, सुनिल निकाडे, दाजीबा तायडे, दत्ता कांबळे, संतोष खिल्लारे, मुरलीधर साळवे, विजय बनसोडे, गौतम सरवदे, स्वप्निल वानखेडे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
मार्केट यार्ड, पनवेल
पनवेल : रयत शिक्षण संस्थेचे मार्केट यार्ड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. ठाकूर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे उपस्थितांनी पूजन केले.
रिपब्लिकन पक्ष, पनवेल
पनवेल : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने (पनवेल शहर) महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष प्रकाश जाधव, विधानसभा अध्यक्ष सागर जाधव, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, अविनाश अडागळे, तसेच आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.