Breaking News

शासकीय योजनांच्या प्रमाणपत्र, कार्डाचे वाटप

नगरसेविका संजना कदम यांचा उपक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, या योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांमध्ये तयार करण्यात आलेले प्रमाणपत्र व कार्ड याचे वाटप शनिवारी (दि. 20) करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात प्रभागाच्या नगरसेविका संजना कदम, खारघर-तळोजा मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भारतीय जनता युवा मोर्चा मा.सरचिटणीस समीर कदम, तालुका उपाध्यक्ष संतोष शर्मा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस विजय मोरे, युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळाचे सदस्य सुशांत पाटोळे, राजू अचलकर, प्रणय मोरे, योगेश जोशी, अनिल बोरे, नवनाथ गाढवे, विक्रम कानसे, प्रथमेश मोरे, अभिजीत गायकवाड अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी व प्रभाग क्रमांक 06 मधील भाजप कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागातील व खारघर परिसरातील विविध नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र व कार्ड घेण्यासाठी लोकांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमादरम्यान नगरसेविका  संजना कदम यांनी आपण आपल्या कार्यालयामध्ये विविध सरकारी योजनांचे आयोजन आपण यापूर्वीही केले आहे. तसेच यानंतरदेखील जा योजना लोकांसाठी आवश्यक आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही आमचा जनसंपर्क कार्यालयातून करू व लोकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही दिली.

आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्मानीय प्रशांत ठाकूर साहेब यांनी पनवेल महानगरपालिकेचा सर्व नगरसेवकानी नगरसेविका संजना कदम व समीर कदम यांच्याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारच्या सरकारी योजना लोकांपर्यंत  पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे व लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, उत्तर रायगड जिल्हा

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply