Breaking News

जेनिज ट्युलिपच्या चिमुकल्यांनी धरला ताल

वार्षिक स्नेहसंमेलनात रमले विद्यार्थ्यांसह पालक

कर्जत : बातमीदार : एप्रिल महिना उजाडला की शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा असते, पण निकालाच्या दिवशी चक्क सांस्कृतिक कार्यक्रम, ही संकल्पना नेरळमधील जेनिज ट्युलिप या लहान मुलांच्या इंग्रजी शाळेने प्रत्यक्षात आणली. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने गर्दी केली होती.

जेनीज ट्युलिप या प्ले ग्रुप ते सिनियर केजीपर्यंत शिक्षण देणार्‍या शाळेची पहिली बॅच प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडली. शाळेने निकालाच्या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी नृत्य कलाविष्कार सादर केले. नेरळच्या सरपंच आणि शाळेच्या पालक जान्हवी साळुंखे, शाळेच्या विश्वस्त नम्रता कांदळगावकर आणि नितीन कांदळगावकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना, तसेच पालकांनादेखील सन्मानित करण्यात आले. या वेळी

सर्वोत्कृष्ट पालक म्हणून गणेश बदले यांना, तर विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट टिफिन देणारे प्रवीण शिंदे, तसेच परफेक्ट प्रेझेंटी अवॉर्ड वैभव पटवर्धन यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थाचा सन्मान जसकिरत सिंग याने पटकावला.

शाळेच्या संस्थापक नम्रता कांदळगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात आमच्या संस्थेतील सर्व बालके स्मार्ट आहेत, असा विश्वास व्यक्त केला. सरपंच जान्हवी साळुंके यांनी जेनिज ट्युलिपच्या शैक्षणिक दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. पालक दिप्ती शिंदे यांनी शाळेविषयीचे अनुभवकथन केले. या वेळी दोन ते पाच वयोगटातील 50 हून अधिक चिमुकल्या बालकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सुनीता कांदळगावकर, अनिता कांदळगावकर, अनिता पारकर, अनिल पारकर, अनिल जैन, देवयानी दीक्षित आदींसह पालक उपस्थित होते. शाळेच्या पहिल्या बॅचचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्या शिनारे, अमृता पांढरे, वर्षा दाभाडे आणि नामाह रूपावाला यांनी मेहनत घेतली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply