Breaking News

खोपोलीत भाजप दक्षिण भारत सेलची बैठक

खोपोली : रामप्रहर वृत्त
खोपोली येथे प्रथमच भाजप दक्षिण भारत सेलची बैठक रविवारी (दि. 21) झाली. या बैठकीस खोपोली भाजप मंडलचे अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, मंडलचे सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर, स्थानिक भाजप नगरसेवक तुकाराम साबळे, जिल्हा दक्षिण भारत सेलचे श्रीनिवास कोडुरु, जिल्ला संयोजक थाहिर अली आणि श्रीमती यमुना आदी उपस्थित होते. साबळे आणि खोपोली येथील दक्षिण भारतीय बलवान के. षण्मुग यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत अक्षय षण्मुग यांची खोपोली दक्षिण भारत सेल मंडलच्या संयोजकपदी एकमताने निवड करण्यात आली. इतर सर्व सभासदांची निवड करण्यासाठी 15 दिवसांच्या आत आणखी एक बैठक आयोजित केली जाईल, असे या वेळी सांगण्यात आले. या बैठकीत श्रीनिवास, जिल्हा संयोजक व इतर जिल्हाधिकारी सदस्यांनी काही गोष्टींवर प्रकाश टाकला. यामध्ये सर्व दक्षिण भारतीयांना भाजपसोबत आणणे, खोपोलीत कार्यरत विविध दक्षिण भारतीय गटांकडे जाण्यास प्रारंभ करा आणि आत्मनिर्भर भारत अभियान, इतर प्रधानमंत्री मंत्रालयाच्या व मुख्यमंत्री योजनेंतर्गत या विविध योजनांबद्दल चर्चा करण्यात आली. नोव्हेंबर 2021मध्ये होणार्‍या नगरपालिका निवडणुकांपूर्वी ऑक्टोबर 2021मध्ये छोट्या सभा आणि मोठ्या बैठकांचे आयोजन करा आणि सध्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी काम करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. अध्यक्ष खंडेलवाल आणि सरचिटणीस हेमंत यांनी पक्षाची रचना स्पष्ट केली आणि खोपोलीतील दक्षिण भारतीय लोकांचे महत्त्व सांगितले. या बैठकीला अक्षय शानमुघम, के. के. श्रीजित, ओ. कुट्टन पिल्लई, के. दिवाकरण, दिनेश प्रेमदास, योगेश पुजारी, वीरेंद्र शेट्टी, सुरेश आंचन, रवींद्र पुजारी, अनिल कुमार, के. के. श्रीकुमार, अरुण डेव्हिड, श. फरहान, ईश्वर शिंपी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply