पुणे ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना मदत, गरीब विद्यार्थ्यांना विद्यादान आणि अभावाच्या स्थितीतही वेगळी वाट चोखाळून समाजकार्य करणार्या 35 शिलेदारांच्या शिरपेचात ‘युवा वॉरियर्स’ हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक अमर पाटील यांचा शनिवारी (दि. 20) ‘युवा वॉरियर्स’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
‘युवा वॉरियर्स’ पुरस्कार प्राप्त झालेल्या शिलेदारांकडून समाजातील इतरांना समाजकार्याची प्रेरणी मिळावी, तसेच त्यांच्याकडूनही देशसेवा घडावी हा पुरस्कार देण्यामागचा संस्थेचा उद्देश आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक अमर पाटील यांचा ‘युवा वॉरियर्स’ पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.