धाटाव : प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एक्सेल स्टॉप येथे नुकताच धाटाव पंचायत समिती गणातील युवा वॉरियर्स शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, भाजप नेते संजय कोनकर, रवी भाऊ मुंडे, युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग, रोठ बुद्रुकचे उपसरपंच वेदिका डाके, श्रीपर्ण पतसंस्थेच्या चेअरमन श्रद्धा घाग, जिल्हा सोशल मीडिया संयोजक राजेश डाके, चिटणीस नरेश कोकरे, अमोल घाग यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी धाटाव युवा वॉरियर्स शाखेच्या पदाधिकार्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यात ओमकार घाग (अध्यक्ष), राहुल डाके, रोहित यादव, नरेश भगत, अमर वारंगे (सर्व सरचिटणीस), दीपक कोल्हटकर, विनोद मोरे, प्रबोध घाणेकर, प्रतिक घाग, विकास बामणे, रोहित कांबळे, राहुल खैरे, जयंता कोकरे, विशाल टेंबे (सर्व चिटणीस) यांचा समावेश आहे.