रेवदंडा : प्रतिनिधी
सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडासा विरंगुळा, तसेच वन डे पिकनीक ही गरज बनली आहे. समुद्रकिनारी जाऊन मनाला फ्रेशनेस मिळविण्याचे फॅड सध्या रूजत आहे. त्यामुळे रेवदंडा, थेरोंडा समुद्रकिनारी कॅम्पींग सुविधा जोरात असून, तेथील टेन्ट हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसते.
शहरवासियांना समुद्रकिनार्याचे वेड असल्याने कॅम्पीग टे्रड भलतेच फार्मात असून शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी मनसोक्त फिरून, खेळून मनाला समाधान, शांती मिळविण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. रेवदंडा, थेरोंडा समुद्र किनारी स्थानिकांनी कॅम्पींग सुविधा उपलब्ध केली आहे. दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी वन डे पिकनीकचे आयोजन करून मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातील असंख्य पर्यटक रेवदंडा, थेरोंडा समुद्र किनार्याला भेटी देत आहेत. सायकांळी समुद्रकिनारी फिरून रात्रीच्या वेळी डान्स, नाचगाणे, जेवण व रात्री टेंन्टमध्ये आराम असा एका वेगळ्याच फार्म्युल्यातील एन्जॉय या कॅम्पींग सुविधेतून पर्यटकांना मिळतोय. त्यामुळे सध्या कॅम्पीग फंडा भलताच जोरात असून कॅम्पीगमधील टेन्ट कायम गर्दीचे ठरत आहेत. कॅम्पींग फॅडने रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी भेट देणार्या पर्यटकांची संख्या फारच वाढली असून, सध्या सायकांळच्या वेळी रेवदंडा, थेरोंडा समुद्रकिनार्यावर गर्दीचा महापूर असतो. या कॅम्पीग सुविधेतून येथे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून स्थानिक गरजेच्या वस्तूंना मागणी वाढत आहे.