Breaking News

सामाजिक बांधिलकी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार

नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर आणि त्यांच्या संस्थेचे नेरळ केंद्रप्रमुख शिवाजी दराडे यांनी टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना  दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल यांचे वाटप केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी बौद्धीक, शारीरिक, मनोरंजनात्मक, खेळ सादर करण्यात आले. या वेळी सुनिल इंदप, शिल्पा इंदप, ओमी ढेकले, मिलिंद डांगरे, अनिकेत अरोलकर, प्रियंका थोतम, प्रथमेश जावडे, विवेक परब, हरिचंद्र आढारी, वसंत ढोले, लव्हाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक कोडक, शिक्षिका थोरात, कारोटे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. टपालवाडी शाळेचे मुख्याध्यापक रामदास कचरे यांनी सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर यांचे आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply