Breaking News

खासदार श्रीरंग बारणे आज अर्ज भरणार

पनवेल : शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे मंगळवारी (दि. 9) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 10 वाजता आकुर्डी ते निगडी प्राधिकरण कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री गिरीश बापट, विजय शिवतारे, खासदार अनिल देसाई, अमर साबळे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार नीलम गोर्‍हे, लक्ष्मण जगताप, संजय उर्फ बाळा भेगडे, मनोहर भोईर, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची उपस्थिती लाभणार आहे. या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply