नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर
पनवेल मधील अशोक बाग येथे अनेक दिवसांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. येथील समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तत्काळ प्रशासनाकडे पाठपुरावा केला ड्रेनेजची साफसफाई करवून घेतली. त्यामुळे येथील नागरिकांनी पाटील यांचे आभार मानले आहेत.
अशोक बागमधील रहिवाशी गेल्या 10 दिवसांपासून ड्रेनेजच्या समस्येने त्रस्त होते. घरासमोरील सर्व्हिस ड्रेनेज हे तुडुंब भरून वाहत होते आणि त्यातून अतिशय दुर्गंधी होत होती तसेच डासांचा प्रादुर्भावही वाढत चालला होता. प्रशासनाकडे तीन ते चार वेळा अर्ज देऊन ही कार्यवाही होत नव्हती. ही समस्या घेऊन अशोक बागमधील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रश्न लक्ष्यात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकार्यांशी बोलून लगेच ड्रेनेज साफसफाई करून घेतले. आपल्या समस्येचे त्वरित निरसन करून दिल्याबद्दल अशोक बाग रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.