Breaking News

महिला सुरक्षेचे विषय तरी राजकारणाच्या पलिकडे असावे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला सुनावले

मुंबई : प्रतिनिधी

सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीमान्यासाठी शनिवारी (दि. 27) भाजप महिला मोर्चाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली. या वेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो. असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply