Breaking News

आझादी का अमृत महोत्सवनिमित्त पोलादपुरात सुप्रशासन सप्ताहाचा शुभारंभ

पोलादपूर : प्रतिनिधी

आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुप्रशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिक  आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून  नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, संजय गांधी योजनेसंबंधी कामे, नवीन मतदार नोंदणी झालेले ओळखपत्र वाटप, नवीन शिधापत्रिका व दुय्यम शिधापत्रिका तसेच शिधापत्रिका नाव वाढवणे आणि कमी करणे, नवीन आधार नोंदणी तसेच दुरुस्ती, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस, आरोग्य तपासणी आणि फेरफार अदालत आदी योजनांचा लाभ नागरिकांना या शिबिरात देण्यात आला. त्यासाठी महसूल विभागाचे अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, मंडलाधिकारी, तलाठी, शिपाई व कोतवाल तसेच आरोग्य विभाग आणि सेतू केंद्राचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.तहसीलदार दिप्ती देसाई, निवासी नायब तहसीलदार शरद आडमुठे, नायब तहसीलदार समीर देसाई यांनी या सुप्रशासन सप्ताहात सहभाग घेतला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply