Breaking News

भाजपचा स्थापना दिवस उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस खारघर मंडलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन खारघर शहर उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या निवासस्थानी खारघरच्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऐकले.

या वेळही खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष रमेश खडकर, बीना गोगरी, दिलीप जाधव, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, गुरुनाथ गायकर, सरचिटणीस साधना पवार, उत्तर रायगड जिल्हा सोशल मिडीया संयोजिका मोना अडवाणी, ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, विपुल चौतालिया महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, आशा शेडगे, सुनील गायकवाड, सचिन केदार, कमलेश मिश्रा, आनंद कांबळे, सुनील गायकवाड, भानत, विनोद दाभोळकर, सीमा खडकर आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply