Breaking News

नियम न पाळणार्‍यांवर पोलिसांचा वॉच; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पनवेलमध्ये कारवाई मोहीम

पनवेल : वार्ताहर

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धडक कारवाया सुरू आहे. यामुळे पनवेलमधील नागरिकांमध्ये कारवाईच्या भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासह देशात सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा या लाटेचा प्रसार होताना दिसत आहे. पनवेल तालुक्यातही रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढत आहेत. हे रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरीने प्रयत्न सुरू आहेत. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. असे असतानाही वेळोवेळी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, सार्वजनिक उपस्थिती कमी प्रमाणात लावा यासारखे अनेक आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. अनेकांना विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी शासनाकडून काही अटी व शर्ती सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. असे असतानाही काही जण मोठ्या प्रमाणात या अटी व शर्तीचे पालन न करता बिनधास्तपणे कार्यक्रम करत असल्याने अशांविरोधात सर्वच ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हळदी समारंभ, लग्न, पुजा, वाढदिवस व फार्म हाऊसवरच्या पाटर्या यावर कारवाई सुरू आहे. तसेच रस्त्यावर बिनदिक्कतपणे मास्क न लावता चालणे किंवा वाहने चालविणे अशा व्यक्तींवरसुद्धा नियमाप्रमाणे कारवाई सुरू असल्याने अशा प्रकारे पोलिसांचा धाक आता चांगलाच सर्वसामान्यांवर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कोविड लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरात सुरू आहे. तरी या लसीकरणाचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सुद्धा शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply