उरण : वार्ताहर
उरणचे कॉम्रेड कृष्णा रघुनाथ पाटील उर्फ के. आर. पाटील यांच्या हस्तलिखीत लेखांच्या अनभिज्ञ निर्भिड के. आर. पाटील या पुस्तकाचा प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले.
उरण नागाव येथील श्रीमद् परमहंस स्वामी महाराज विरक्ताश्रम (मठी) येथे झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा अॅडव्होकेट पी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमास उद्योजक जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, संतोष केणे, आर. सी. घरत, हभप ई. ए. पाटील, नवी मुंबई नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, दा. चा. कडू गुरुजी, नागावच्या सरपंच रंजना पाटील, मठीचे अध्यक्ष नगराजशेठ, चारूदत्त पाटील, चंद्रकांत घरत, जनार्दन भोईर, संतोष पवार, अॅड. राजेंद्र भानुशाली, पत्रकार प्रवीण पुरो, रवी वाडकर, कॉम्रेड के. आर. पाटील यांचे पुत्र अॅड. डी. के. पाटील, आर. के. पाटील, कन्या विद्या म्हात्रे, रत्ना पंडित आदी उपस्थित होते. या वेळी उरण पसिरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवघर येथील गणेश बंडा आणि सहकारी यांचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम या वेळी करण्यात आला.