मुंबई : प्रतिनिधी
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणार्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाहीये. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुटी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह लग्न करणार असून, त्यासाठीच त्याने मालिकेतून माघार घेतल्याचे समजते.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यावर होणार्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही बुमराहला आराम देण्यात आला आहे. बुमराहने लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतली असल्याचे वृत्त बीसीसीआयमधील सुत्रांच्या आधारे एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …