Breaking News

एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नूतनीकरण

मुंबई : प्रतिनिधी

एलआयसी ऑफ इंडियाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सोबत व्यवसाय सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले. एलआयसीचे वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक ए. डी. वारकरी व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी करारपत्रावर स्वाक्षर्‍या केल्या. लोकमान्य सोसायटी 2017 पासुन एलआयसीची कार्पोरेट सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे. लोकमान्यने पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या पोलिसीची विक्री केली आहे. लोकमान्य सोसायटीच्या 213 शाखांमधून एलआयसीच्या सर्व विमा पॉलिसींची विक्री व जाहिरात केली जाते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत माहिती पोहचविली जात आहे. या वेळी बोलताना एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक ए. डी. वारकरी यांनी लोकमान्यच्या यावर्षीच्या योगदानाबद्दल तोंडभरून कौतुक केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लोकमान्यने आतापर्यंत 511 पॉलिसी विक्री केल्या आहेत. यातून 4.76 कोटी रुपयांचा वार्षिक हप्ता भरला जातो. यामुळे बेळगाव विभागात लोकमान्यने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बेळगाव विभागात बेळगाव, विजापुर, व बागलकोट या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच दक्षिण मध्य विभागात दहावा क्रमांक मिळविला आहे. दक्षिण मध्य विभागात कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगना राज्याचा समावेश होतो. लोकमान्यसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे ऑल इंडिया कापरिट एजन्सी न्यू बिझनेसमध्ये संपूर्ण भारतात लोकमान्य सोसायटीचा सहावा क्रमांक आहे. या वेळी बोलताना लोकमान्यच्या संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी एलआयसीचे आभार मानून भविष्यातही चांगल्या व्यवसायाची ग्वाही दिली. या करारपत्रावर एलआयसीचे मार्केटींग व्यवस्थापक वाय. एम. मुराळ व लोकमान्यचे सीईओ अभिजित दिक्षित यांनीही स्वाक्षर्‍या केल्या. या वेळी प्रितम बिजलानी, लोकमान्य समुहातील व एलआयसीचे अधिकारी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply