Breaking News

मोरा येथील रक्तदान व आरोग्य शिबिराला भरगोस प्रतिसाद

उरण : वार्ताहर

मुंबईच्या भायखळा येथील मासिना हॉस्पिटल व उरण-मोरा भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 1) मार्च न्यू इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आले. त्यात 185 रुग्णांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली. मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिरास उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, माजी नगरसेविका नंदा माझगावकर, मोरा मच्छिमार सोसायटी चेअरमन प्रवीण कोळी आदींचे सहकार्य मिळाले.या वेळी आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेवक नंदु लांबे, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, माजी नगरसेवक राजेश कोळी, माजी नगरसेविका नंदा माझगावकर, श्याम कोळी, मासिना हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी चारुदत्त वैद्य, डॉ. भावनी शाह, डॉ. चिराग बोराना, डॉ. जाफर सुरा, डॉ. आबासाहेब चव्हाण व डॉक्टरांची टीम आदी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply