Breaking News

अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काँग्रेस-राष्ट्रवादीलाही इशारा

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. या वेळी हिंदुत्वाचा मुद्दा निघाल्याने बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली होती. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी संताप व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला व काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे, तसेच मुस्लिम मंत्र्यांनी जरा लाज बाळगावी व राजीनामा द्यावा, असेदेखील म्हटले आहे.
‘उद्धव ठाकरे विसरले आहेत की ते मुख्यमंत्री आहेत. बाबरी मशिदीत मूर्ती ठेवणे आणि मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर मुख्यमंत्री गुन्हेगारी कृत्य स्वीकारत असतील, तर ते दुर्दैवी आहे,’ असे म्हणत आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगावेसे वाटते की, हे सरकार किमान सामायिक कार्यक्रमावर बनलेले आहे, मात्र येथे मंदिरे व मशिदींवर चर्चा होत आहे. तुम्ही भविष्यात कशा पद्धतीने पुढे जाणार यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे, असे सांगून आझमी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला एकप्रकारे इशारा दिला आहे.
याशिवाय आझमींनी मुस्लिम आरक्षणावरूनही खडेबोल सुनावले. ‘मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात सीएए-एनआरसी लागू करणार नाही. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने असे म्हटले होते की, पाच टक्के आरक्षण (मुस्लिमांसाठी) असेल.
आता ते सत्तेत आहेत. मुस्लिम मंत्र्यांना थोडी लाज वाटायला हवी आणि त्यांनी राजीनामा द्यावा,’ असेही आझमी म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply