नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच परदेश दौर्यावर जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे त्यांना परदेश दौर्यावर जाता आले नाही. 26 व 27 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौर्यावर जाणार आहेत.
बांगलादेश यंदा 50वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे, तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच या वर्षी भारत व बांगलादेशच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौर्यासाठी बांगलादेशची निवड केली आहे.
भारताचे बांगलादेशसोबत असणारे संबंध मजबूत व सौदार्हपूर्ण आहेत. नेबरहुड फर्स्ट धोरणांतर्गत भारताने बांगलादेशला वेळोवेळी मदत केली. भारताने बांगलादेशला कोरोना लशीचे 90 लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. मोदी या दौर्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी व बांगलादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …