Friday , September 29 2023
Breaking News

कबड्डी स्पर्धेत रासळ संघ विजेता

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, डोंबिवली-कल्याण विभागाच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन गोलमैदान, आशापुरा मंदिरासमोर करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत जय हनुमान संघ रासळ संघाने अंतिम फेरीत जय हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघाला तीन गुणांनी मात देत विजेतेपद पटकाविले.

या कबड्डी स्पर्धेत सुधागड तालुक्यातील 16 संघ खेळविण्यात आले. मुंबई  कबड्डी असोसिएशनच्या पंचांनी सामन्यावर देखरेख केली. रासळच्या ब संघाने तृतीय व जांभुळपाडा संघाने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. विजेत्या सर्व संघांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जयेश ठाकूर, उपाध्यक्ष वामन कडू, महेश अधिकारी, सरचिटणीस नामदेव महाले, चिटणीस विनोद ससर, खजिनदार उल्हास पालांडे, उपखजिनदार पंकज दळवी, हिशेब तपासनीस गणेश सितापराव, प्रमुख सल्लागार भरत शिविलकर, बळीराम मोरे, सल्लागार यशवंत कदम, कृष्णा सितापराव, गिरीधर ढेणे, रमेश भोईर, राजू शेडगे, अंकुश मढवी, चंद्रकांत पाटील, केशव मुंडे, रवींद्र मोरे, गोपाळ साठे, मनीष मोरे, राकेश कडू आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply