पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 16 बळींची नोंद शनिवारी (दि. 25) झाली असून, 452 नवे रुग्ण आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यात (महापालिका नऊ, ग्रामीण दोन) 11, रोहा दोन आणि खालापूर, अलिबाग व महाड प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात (मनपा 157, ग्रामीण 39) 196, पेण 46, म्हसळा 44, महाड 42, रोहा 29, उरण 26, अलिबाग 24, कर्जत 18, खालापूर 16, श्रीवर्धन चार, माणगाव व पोलादपूर प्रत्येकी तीन आणि मुरूड तालुक्यात एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 402 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 13,385वर गेला असून, मृतांची संख्या 350 झाली आहे. जिल्ह्यात 8874 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने 3697 रुग्ण सक्रिय आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper