Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

न्हावाखाडी येथे अभीष्टचिंतन सोहळा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, ‘मी मराठी’ संस्कृती दर्शन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या गुरुवारी (दि. 2 जून) 71वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यासाठी येणार्‍या हितचिंतक, शुभेच्छुकांनी पनवेल येथील निवासस्थानी किंवा कार्यालयात न येता 2 जून रोजी न्हावाखाडी येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यास तसेच ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, रुग्णवाहिका लोकार्पण, संस्कृतीचे दर्शन असलेल्या ’मी मराठी’ कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.  राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सुपरिचित आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गरीब, गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. गेल्या चार दशकांत त्यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायमच भरीव योगदान दिले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील लोकांचे प्रेम आहे व ते नेहमीच वृद्धिंगत झाले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 2 जून रोजी न्हावाखाडी येथील म्हसेश्वर मंदिराशेजारील क्रिकेट मैदानावर सायंकाळी 6 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. या सोहळ्यादरम्यान 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ होईल. तत्पूर्वी सायंकाळी 5.30 वाजता आमदार महेश बालदी यांच्या वतीने उलवे नोडकरिता देण्यात येणार्‍या रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत व नंदेश उमप निर्मित लोककलांतून महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडविणारा ’मी मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी येणार्‍या हितचिंतकांनी पनवेल येथील निवासस्थानी किंवा कार्यालयात न येता 2 जून रोजी न्हावाखाडी येथे होणार्‍या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply