Breaking News

नेरेपाड्यात शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नेरेपाडा येथे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. आजही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची गरज आहे, त्या अनुषंगाने विहीघर येथील मरीआई हॉटेलचे प्रोप्रायटर सुजित सुरेश फडके यांनी नेरे पाडा येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, चॉकलेटचे वाटप केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पोकळे, बाळाराम रोडपालकर, मयूर तांबडे, साहिल मोरे, शुभम कोंडिलकर उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षकांनी आयोजकांचे कौतुक केले तर वस्तू मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply