Breaking News

कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

खारघरमधील उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खारघरमधील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 22) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.  या वेळी भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, आयोजक नगरसेविका नेत्रा किरण पाटील, मंडल उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, व्यापारी सेल अध्यक्ष अंबाबाई पटेल, समीर कदम, राजकुमार चौधरी, शोभा मिश्रा, मोना अडवाणी, विलास आळेकर, भरत कोंढाळकर, गोपाळ राजपूत, कुणाल देवकर, वैभव शेजवळ, आदित्य हाटगे, अनिकेत कातोरे, मंजू चोप्रा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या शिबिरात स्वत: किरण पाटील यांनीही दरवर्षीप्रमाणे रक्तदान केले. या उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र, सन्माचिन्ह देण्यात आले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply