कामोठे : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे शाळेतील शिक्षिका सुनीता येवले यांनी मुंबई पश्चिम विभागातून 2020-21चा टाटा क्लासएज क्लासरूम चॅम्पियनशिप पुरस्कार पटकावला. याबाबत टाटा क्लासएज या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांना प्रमाणपत्र आणि करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी 85 शाळांमधील 391 शिक्षक संपूर्ण पश्चिम क्षेत्रातील (महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड) शाळांमधून सहभागी झाले होते. 391 शिक्षकांमधून 22 शिक्षक प्रादेशिक स्तरावर पात्र ठरले. लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे शाळेतील मुक्ता खटावकर, श्रद्धा कारंडे, मालास्मिता भामरे, श्वेता रेन्चवार या सर्व शिक्षिकाही सहभागी झाल्या होत्या. त्यांचाही या वेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रिन्सिपल अर्चना चव्हाण यांचे अभिनंदन व सर्व शिक्षकांचा सत्कार करून गौरव केला.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper