Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल परिसरात महाशिवरात्री भक्तिभावात झाली, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे विविध ठिकाणी होणारे धार्मिक,  आध्यात्मिक तसेच गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम ऑनलाइन किंवा घरगुती स्वरुपातच झाल्याचे चित्र पहायला मिळाले. गुगलमीट, झूम अ‍ॅप अथवा फेसबुक लाईव्ह आदी तंत्रज्ञानाचा वापर करून बर्‍याच ठिकाणी काही कार्यक्रम झालेले दिसून आले.

नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीने सामुदायिक शिवमहिम्न स्तोत्रपठणाचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. यातील सहभागी भाविकांनी आपल्या घरातुनच ऑनलाइन पद्धतीने सामुदायिक स्तोत्रपठणाचा आनंद घेतला. 

भाविकांची गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद असल्याने त्या सभामंडपात होणारे, गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमही काही भाविकांनी आपल्या घरामधे निवडक रसिकांसह केले. काही ठिकाणी ते फेसबुकवर लाईव्ह दाखवण्यात आले.

नवीन पनवेल ब्राह्मणसभेच्या वतीने विविध सामाजिक व आध्यात्मिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम सामुदायिक स्वरूपात केले जातात. यंदा कोरोनामुळे सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याने मंदिरात किंवा अन्य ठिकाणी एकत्र येणे अशक्य होते. म्हणून आम्ही परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून ऑनलाइन स्वरुपात स्तोत्रपठणाचा आनंद घेतला.

-माधुरी सहस्रबुद्धे, ब्राह्मण सभा, नवीन पनवेल

Check Also

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका

संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‌‘लक्षवेधी‌’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि …

Leave a Reply