Breaking News

फणसाड अभयारण्यासाठी निर्बंध लागू; लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

मुरूड : प्रतिनिधी

कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन फणसाड अभयारण्यात कोविड प्रतिबंधक लसीचे डोस न घेतलेल्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती  वन परिक्षेत्रपाल राजवर्धन भोसले यांनी दिली. फणसाड अभयारण्यात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. शांतता, घनदाट झाडी व उंच झाडामुळे पर्यटकांना हे अभयारण्य आवडते. या अभयारण्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. कोरोना व ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अभयारण्यात येणार्‍या पर्यटकांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटकांजवळ लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स तसेच आधारकार्डही आवश्यक आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच अभयारण्यात प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. या आदेशाचे, तसेच शासन नियमांचे उल्लघंन करणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल.

-राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्रपाल, फणसाड अभयारण्य, ता. मुरूड

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply